सोलापूर – नवोदित साहित्यिकांचे विचारपीठ असलेल्या अंकुर साहित्य संघ सोलापूरच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय साहित्य व राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार देण्यात येत असून सन २०-२१ व २१-२२ या दोन वर्षात प्रसिद्ध झालेल्या साहित्य कलाकृतींना हे पुरस्कार घोषित झाल्याची माहिती केंद्रीय उपाध्यक्ष, पत्रकार भरतकुमार मोरे व जिल्हाध्यक्ष कवी नागनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली
हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या९ एप्रिल रोजी दुपारी १ते५ या वेळेत रंगभवन चौकातील समाज कल्याण केंद्र येथे प्रख्यात साहित्यिक प्रा . डॉ . सारीपुत्र तुपेरे यांच्या हस्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा प्रा . डॉ . श्रुतीश्री वडगबाळकरयांच्या अध्यक्षतेखाली तसेच दलित मित्र आप्पासाहेब जाधव गुरुजी (पुणे ) काव्यप्रेमी चे संस्थापक आनंद घोडके ,अंकुर साहित्य संघाचे प्रदेशाध्यक्ष हिंमत ढाले , कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे, रिपाई प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे या मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून याप्रसंगी शहर जिल्ह्यातील कवींचे संमेलन होत आहे. यावेळी सहभागी कवींना संस्थेच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
कवी नागनाथ गायकवाड साहित्य गौरव पुरस्कार २०-२१ (कविता संग्रह) करीता कवी प्रकाश जडे (मंगळवेढा ) यांच्या वासल्यसुक्त या .कवितासंग्रह तसेच सन २१- २२ या वर्षाकरिता सोलापुरातील विद्रोही कवी प्रमोद लांडगे(सोलापूर) यांच्या शहर स्मशानंळतंय तसेच कवयित्री .प्रा. अंजना गायकवाड यांच्या ‘सांग लाडके तुझी जात कोणती’? या काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर झाले आहेत. तसेच सण २०-२१ या सालात प्रसिद्ध झालेल्या उदगीर येथील अंबादास केदार यांच्या तारांबळ या आत्मचरित्रास तसेच २०२१ -२२ या सालात प्रसिद्ध झालेल्या डॉ . खंडेराव शिंदे( कोल्हापूर) यांच्या पकाल्या या आत्मचरित्रास तसेच सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे (पुणे ) यांच्या काजवा या दोन आत्मचरित्रास हा पुरस्कार विभागून दिला जाणार आहे .या पुरस्काराकरिता राज्यभरातून ४५ काव्यसंग्रह व १० आत्मचरित्र आली होती.
तर दलित मित्र स्व .सौदागर मोरे समाजभूषण पुरस्काराकरिता ह्यूमन राईट संस्थेचे जिल्हाध्यक्ष उस्मान शेख ,आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक शुंभागी कलकेरी तसेच भटक्या-मुक्तासाठी काम करणारे आंनदराव गायकवाड या तीन सामाजिक कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे .या पुरस्काराकरिता राज्यातून १० प्रस्ताव आले होते.
रोख रक्कम, गौरवचिन्ह ,प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून ९एप्रिल रोजी दुपारी ३ या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे .दरम्यान दुपारी १ ते ३ या वेळेत शहर जिल्ह्यातील कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले .कवी लेखक साहित्यिक यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष विकास कस्तुरे कवी रामप्रभू माने, अंबादास जाधव आदी उपस्थित होते .