सोलापूर : मधला मारूती चौकातील प्रसिद्ध स्टेशनरी व कटलरी उद्योगातील A.B.Bhumkar या दुकानाचे मालक श्री. अनिलसा बाबूरावसा भूमकर ( वय – ५८ ) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा भवानी पेठ येथील राहत्या घरापासून गुरूवारी सकाळी ८ वाजता निघणार आहे. अंत्यसंस्कार सहस्रार्जून वैकूंठभूमी येथे होणार आहे.
त्यांचे पश्चात पत्नी, २ भाऊ, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.सोमवंशीय सहस्रार्जून क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे ते विश्वस्त होत.
मधला मारूती व्यापारी असोसिएशन, सोलापूर फटाके असोसिएशन, हरळी प्लॅाट योगासन मंडळ अशा अनेक संस्थांवर ते कार्यरत होते