येस न्युज मराठी नेटवर्क ; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला आंदोलनजीवी हा शब्द मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर चांगलाच चर्चेत आहे. त्यांनी आता आंदोलनजीवी म्हणजे व्यावसायिक आंदोलक उदयास आले असून तेच सर्व आंदोलनांमध्ये दिसत आहेत. हे परोपजीवी आंदोलक प्रत्येक आंदोलनावर पोसले जात आहेत, अशी टीकाही केली. आंदोलनजीवीहूँजुमलाजीवी_नहीं असा हा हॅशटॅग असून या हॅशटॅगवर ६० हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी या शब्दामधून आंदोलन करणाऱ्यांना टोला लगावल्यानंतर आता आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी आम्ही आंदोलक असलो तरी खोटे दावे आणि आश्वासने देणारे नाहीत असं सांगणारा हा हॅशटॅग ट्रेण्ड केलाय. २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१५ साली एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदा जुमला या शब्दाचा वापर केला होता