मोहोळ – २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावाजवळ उड्डाणपुलावर मोडनिंब वरून वडाचीवाडी येथे जात असताना दुचाकी क्रमांक MH 45 AT 0260 ला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून टायर गेल्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून सदर अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाला मोहोळ येथील खासगी रुग्णवाहिकेमधून वरवडे टोल नाका येथील डॉ.महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे आणि शेटफळ येथील ग्रामस्थांच्या यांच्या मदतीने मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील गस्तीपथक प्रमूख उमेश भोसले,गस्तीवाहन चालक नागनाथ भालेराव, सहाय्यक स्वप्नील शिंदे आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी किरण आवताडे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले .
या अपघातातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव बापू हरिबा निळे वय 30 वर्षे रा. वडाचीवाडी, तालुका.माढा, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र असे आहे.सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी क्षिरसागर यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे.