२,५१,००० आणि चेक बुकचा समावेश
सोलापूर : मुद्रासन सिटी येथील इन्क्लुजन लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमधील तिजोरी सात जून रोजी रात्री साडेबारा ते सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या तिजोरीमध्ये बँकेचे चेक बुक व २,५१,००० रुपये रोख असल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रवीण कुमार प्रेमनाथ शिंदे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. कंपनीच्या लाकडी दरवाजाचा कोयंडा तुटलेल्या स्थितीत आढळून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर अधिक तपास करीत आहेत.