येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि युवा कौशल्य दिनानिमित्त सोलापुरातील देवपुष्प फौंडेशनच्या वतीनं संस्थापक राहूल काटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य नोकरी मेळाव्याचं, रविवारी, 21 जुलै रोजी, सकाळी 9 ते 4 या वेळेत ड्रीम पॅलेस बँक्वेट हॉल इथं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे, बारामती, चाकण, सोलापूर आदी भागातील 60 हून अधिक नामवंत कंपन्याचा सहभाग या नोकरी मेळाव्यात होता. 5 हजारहून अधिक जॉब या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आले होते. अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मेळाव्यास मिळाला. विविध भागातून सुमारे चार हजार हून अधिक युवा – युवती या नोकरी मेळाव्यात सहभागी झाले होते. नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन, संबंधित जागेसाठी त्यांची निवड करुन, विविध कंपन्यांच्या वतीनं जागीच त्यांना नियुक्त पत्र देण्यात आलं.
दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, जयप्रकाश इंगळे , माजी नगरसेवक अनंत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिवाजी जाधव, दिनेश काटकर यांच्या हस्ते आणि नागेश खरात, सचिन खरात, संध्या जाधव, सुनिता कोरे, पंकज काटकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दीपप्रज्वलन करुन या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचा यावेळी देवपुष्प फौंडेशनच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला.
: देवपुष्प फाऊंडेशनचे संस्थापक संस्थापक राहुल काटकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात यांनी या नोकरी मेळाव्याचं उद्देश स्पष्ट केला. सोलापुरातील सुशिक्षीत आणि होतकरु युवा युवतींना नोकरी महोत्सव या संकल्पनेतून नोकरीची सुवर्णसंधी मिळावी, त्यांना योग्य ती दिशा मिळावी, नोकरी देतो म्हणून त्यांची फसवनुक होऊ नये त्यांना नोकरी मिळावी म्हणून खारीचा वाटा उचलण्याचा देवपुष्प फाऊंडेशनने हा एक प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी राहूल काटकर यांच्या सामाजिक कार्याचं, जिद्दीचं आणि तरुणांप्रती असणाऱ्या एकूणचं तळमळीचं मनापासून कौतुक केले , या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न हा अत्यंत स्तुत्य असल्याच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान मेळाव्यास उपस्थित युवा – युवतींनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं. आम्हाला नोकरीची गरज होती, आणि आम्हाला नोकरी मिळाली, जागीच नियुक्ती पत्र मिळालं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मेळावा यशस्वी करण्यासाठी सागर गवळी , महेश वाघमारे, आशिष इंगळे, आकाश इंगळे,शुभम काटकर, श्रवण भोसले ,श्रीकांत कोकितकर , निलेश काटकर ,राहूल दहिहंडे , मयुरेश माणकेश्वर, रोहित परदेशी, दिनेश भालेराव, किरणकुमार कोटा ,सन्मित्र काटकर, यांनी परिश्रम घेतले . या मेळाव्यात 410 जणांना जागीच नियुक्ती पत्रं देण्यात आली तर 1400 उमेदवारांना मुलाखतीसाठी दुसऱ्यांदा बोलावण्यात आले आहे. या एकूणचं उपक्रमांचं तरुणाई मधून मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे.
