नवी दिल्ली : बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्ताराआधी रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री मंडळाचा राजीनामा दिला होता. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांच्यावर लवकरच पक्षातून महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल.
दोघांनाही पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस किंवा राष्ट्रीय उपाध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे. यासह निवडणूक राज्यांच्या प्रभारीचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली जाऊ शकते.पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेत रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, निशंक आणि हर्षवर्धन यांच्यासह काही नेत्यांचा निवडणूक राज्यांच्या संघटनेची जबाबदारीमध्ये समावेश होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.