नगरसेवक सुरेश पाटील यांचा सत्कार
सोलापूर : अमृतयोजनेअंतर्गत अर्धवट राहिलेल्या रस्त्यांचे काम मार्गी लागल्याने व्यापारी वर्गांकडून सोमवारी सो.स क्षत्रिय (सावजी) समाज विठ्ठल मंदिरात सर्व मान्यवरांचे सत्कार समारंभ ठेवण्यात आले होते. या प्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील, क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष गणपत मिरजकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बिद्री, नागनाथ पवार, सुभाष शालगर, अक्षय बिद्री आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सोलापुरातील अमृतयोजनेअंतर्गत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. गेल्या एका वर्षापासून अनेक ठिकाणी रस्ता खड्डेमय झाल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गाचेही कंबरडे मोडले आहे. अनेक ठिकाणी अपघात घडत आहे. सो. स क्षत्रिय (सावजी) समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट व व्यापारी संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी नगरसेवक सुरेश पाटील यांना घटना स्थळाची तक्रार देताच सुरेश पाटील यांनी कामे वेळेत पूर्ण न झाल्याने व्यापाऱ्यांसमवेत आंदोलन केले होते. यानंतर पालिका प्रशासनाने रस्त्याची दखल घेत कामाला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्री काम हाती घेतले असून लवकरच पूर्ण होईल अशी माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात जर कामे होत नसतील तर आम्ही आंदोलन करू. आगामी निवडणुकीत नगरसेवक सुरेश पाटील यांना आमदार करणार असल्याची माहिती सुरेश बिद्री यांनी दिले. सेवक असावा तर जनतेचा काम करणारा असावा. निवडणुकीत जे उमेदवार कामे केली आहेत त्यांनाच निवडून आणू अशी प्रतिक्रिया सुरेश बिद्री यांनी दिले.
याप्रसंगी व्यापारी गोपाळ काटवे, महेश भूमकर, शुभम कलशेट्टी, नंदकुमार शिवगुंडे, मुकेश त्रिमल, शुभम पुणेकर, तुळशीदास पवार, माणिक शालगर, पवन रंगरेज आदी व्यापारी व नागरिक उपस्थित होते.