• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, March 29, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोल्हापूरची अमृता पुजारी ४ थी महिला महाराष्ट्र केसरी!

by Yes News Marathi
March 29, 2026
in इतर घडामोडी
0
कोल्हापूरची अमृता पुजारी ४ थी महिला महाराष्ट्र केसरी!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूरच्याच वेदिका सासणेला अस्मान दाखवून महाराष्ट्र केसरी किताबावर नावं कोरले

– चांदीची गदा आणि सोनेट कारचे बक्षीस पटकावले 

– उपविजेती वेदीका सासणे बुलेटची मानकरी 

सोलापूर (प्रतिनिधी) :

सोलापुरात रविवारी झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चित्तथरारक  अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

   महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासणे यांच्यात झाली. सुरुवातीपासून अमृता हिने आक्रमक चाल खेळत वेदिकाला कब्जात ठेवले.

पहिल्या दीड मिनिटात दोन गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा तीन गुण मिळवून पहिल्या सत्रात पाच शून्य अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात वेदिकाने आक्रमक चाल खेळली परंतु अमृताने संयम दाखवत पुन्हा दोन गुण घेतले आणि विजय पक्का केला. शेवटचे दोन मिनिटे अमृताने डिफेन्स करत वेदिकाला थोपवून ठेवले. ७-० अशा फरकाने अमृताने वेदिकाचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विजेत्या अमृता पुजारी हिला चांदीची गदा , रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सोनेट कारची चावी प्रदान करण्यात आली. तर उपविजेत्या वेदिका सासनेला २५ हजार रुपये रोख ,स्मृतिचिन्ह आणि बुलेट बक्षीस देण्यात आली.

   दरम्यान अमृता पुजारी हिने वेदिका सासने हिच्यावर मात केल्यानंतर समर्थक महिला कुस्तीपटू यांनी अमृता पुजारी आणि प्रशिक्षक दादासो लवटे यांना खांद्यावर घेऊन कुस्तीच्या मैदानामधून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.

   यावेळी महापौर विनायक कोंड्याल,हिंद केसरी योगेश दोडके,आयोजक स्वाती अळळीमोरे-साखरे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेनजयराजे भोसले, ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फड, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, समाधान घोडके, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, मौला शेख, उमेश सूळ, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, रमेश बारसकर, सागर कल्याणशेट्टी, पैलवान लोखंडे, उद्योजक सागर कत्ते, प्रकाश वानकर, सुधा अळळीमोरे, योगेश बोंबाळे, श्रीदेवी फुलारे, युवराज सरवदे, उपस्थितांमध्ये सेरेंटिका रिन्युएबल्सचे सुरजीत नारायण, यांचेसह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

Previous Post

बाल महोत्सवामुळे मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In