सोलापूर : दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय व दयानंद विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधानाचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत ‘भारतीय संविधानातील मुल्य धर्मनिरपेक्षता’ या विषयावर प्रा.डॉ. प्रदीप जगताप यांचे व्याख्यान शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. एस. जे. गायकवाड ह्या होते. प्रा. डॉ. प्रदीप जगताप यांनी आपल्या भाषणात समानतेचा हक्क, जगण्याचा धार्मिक हक्क याविषयी घटनात्मक तरतुदी सांगितल्या. भारतीय संविधानामुळे हा देश आजपर्यंत अखंड राष्ट्रीय एकात्मता टिकवून आहे. संविधान साक्षरता व संविधानात्मक नागरिकांची, राज्यकर्ते प्रशासक यांना कायद्याची ओळख होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बी.एच. दामजी यांनी केले.
कार्यक्रमाचा उद्देश व प्रास्ताविक प्रा.मोहन कटप यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रा. जी.एस. घनाते यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अष्टमी माशाळकर हिने केले.
कार्यक्रमास प्रा. एस.जी. दंतकाळे, प्रा. अरविंद देढे, प्रा. रवींद्र चलवादी, प्रा. प्रथमेश शिंदे, प्रा. शटगार, प्रा.बुगडे, प्रा. रेखा मलजी, प्रा. हिंगमिरे, प्रा. सौ. गढवालकर, प्रा. स्वप्ना वळसंगे, प्रा. रेखा परदेशी व प्रा.के.जे. राठोड यांच्यासमवेत बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.