सोलापूर: पुणे येथे पार पडलेल्या फायर अॅण्ड सिक्युरीटी असोसिएशन ऑफ इंडिया (FSAI) च्या कार्यकारणी समितीच्या पदग्रहण सोहळ्यात सोलापूरचे सुपुत्र अमोल उंबरजे यांची ॲडव्होकेसी चेअरपदी निवड करण्यात आली आहे. तर सुजल शाह यांची अध्यक्षपदी आणि अजित यादव यांची सचिवपदी निवड झाली आहे.
FSAI हे संपूर्ण देशभर अग्निसुरक्षा आणि सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेले एक अग्रगण्य व्यासपीठ आहे. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून अग्नी व सुरक्षा विषयक जनजागृती घडवून आणणे. यासाठी असोसिएशन विविध उपक्रम व प्रकल्प राबवते.अमोल उंबरजे यांची ही निवड सोलापूरसाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनच्या ॲडव्होकेसी उपक्रमांना निश्चितच नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.