शरद पवार, आशिष शेलार पॅनलचे अमोल काळे यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अमोल काळे यांना 181 मते मिळाली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक गुरुवारी झाली. एमसीएच्या निवडणुकीसाठी 380 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 181 मते मिळाली आहेत. संदीप पाटील यांना 158 मते मिळाली आहेत. त्यामुळे अमोल काळे यांचा 23 मतांनी विजय झाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला संध्याकाळी सुरुवात झाली.
मतमोजणीच्या सुरुवातीला मिलिंद नार्वेकर, अजिंक्य नाईक, अभय हडप हे 3 उमेदवार पुढे असल्याची माहिती समोर आली होती. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्यात लढत झाली.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, निलेश भोसले, अभय हडप, समद सूरज, मंगेश साटम, संदीप विचारे आणि प्रमोद यादव यांचा समावेश झाला आहे. 343 पैकी 180 पेक्षा जास्त मते मिळाल्यानंतर निकाल औपचारिकपणे जाहील होण्याआधीच कार्यकर्त्यांनी जल्लोषाला स्वागत केले. अमोल काळे हे मागच्या तीन वर्षांपासून एमसीए मध्ये कार्यरत होते, त्यांच्याकडे उपाध्यक्षपद होते.