येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रविवारी सिंधुदुर्गात येणार आहेत. भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी अमित शहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.कुडाळा तालुक्यातील पडवी गावात खासगी ७० एकर जमिनीवर चार वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात केली होती. मागच्या सात दशकांपासून सिंधुदुर्ग जिल्हा चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित असल्याचे राणे यांनी सांगितले.