सोलापूर : अमित उर्फ पप्पू अप्पासाहेब आडके (रा. किरकीरी आई चौक, मु.पो. देगांव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) याच्या विरुध्द २०१२, २०१९ व २०२४ या या वर्षांमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, खुन करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन अमित उर्फ पप्पू अप्पासाहेब आडके यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर नवी मुंबई येथे सोडण्यात आलेले आहे.