सोलापूर – घराचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य माणसापासून ते बिल्डरांनी उभारलेल्या गृह प्रकल्पाच्या विक्रीपर्यंत विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या अमर बिराजदार या युवकाने वयाच्या २६ व्या वर्षी उभारलेला व्यवसाय या क्षेत्रातील विश्वासाचे प्रतीक बनला आहे.
अमर बिराजदार हे मुळचे दक्षिण सोलापूर मधील निंबर्गी गावचे. संगमेश्वर महाविद्यालयातून एमकॉम व एमबीए केल्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात जाण्याचे ठरविले. प्रारंभी त्यांनी या क्षेत्राचा बारकाईने अभ्यास केला. यादरम्यान त्यांच्या हे लक्षात आले की, बांधकाम करण्यापेक्षा बांधलेल्या प्रकल्पाचे विक्री व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.कारण ते वेळेत विक्री नाही झाले तर ते नुकसानीचे ठरु शकते. याचा अभ्यास करून घरे विक्रीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची ‘ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन’ फर्म ही सोलापुरातील विविध भागातील प्लॉट, फ्लॅट, शॉप, रो हाऊसच्या पंधराहून अधिक नामवंत प्रकल्पांचे पर्याय सोलापूरकरांना उपलब्ध करून देण्याची सेवा देत आहे.आजपर्यंत पाच प्रकल्पांची त्यांनी विक्री केली. प्रकल्पांचे डेव्हलपर व प्रकल्पांमध्ये प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांनी दिलेली सेवा उपयुक्त ठरली आहे.
ज्या व्यक्तीचे घर बांधण्याचे स्वप्न आहे त्यास त्याचे आर्थिक नियोजन, जागा व घर खरेदीचे बजेट, कर्ज योजना, बॅंकांशी संवाद, बांधकाम मार्गदर्शनापासून ते घर ताब्यात मिळेपर्यंत मदत होते. बिल्डरांना त्यांच्या गृहप्रकल्पाची विक्री करण्यासाठी लागणारे मार्केटिंग, ग्राहकांचा शोध, फ्लॅट विक्रीपर्यंतची सेवा ते देतात.या शिवाय नव्या गृहप्रकल्पांबाबत साईट लोकेशन सर्वेक्षण, ग्राहकांच्या अपेक्षेनुसार लागणाऱ्या नवनवीन अमेनिटीझ, विक्रीसाठीचे स्ट्रॅटेजीस याबाबत सल्लागाराची भूमिका हा उद्योग बजावतो. या सेवांसाठी व्यवहाराची काटेकोर कायदेशीर तपासणी, ग्राहकांचा विश्वास या दोन्ही घटकांना त्यांनी कायम प्राधान्य दिले आहे.
रिडेव्हलपमेंटची सुरवात
विक्रीसेवे सोबतच, ॲबिलीटी कन्स्ट्रक्शनने रिडेव्हलपमेंट अंतर्गत बांधकाम क्षेत्रात येण्याचे ठरविले आहे.ज्यामध्ये अपार्टमेंट धारक एकत्र येवून त्यांच्या जागेची पुनर्बांधणी करु शकतात. त्यामुळे त्यांना जागेसाठीचा खर्च न करता त्याच जागेवर नवे फ्लॅट मिळू शकतात. यामध्ये नवीन इमारत, बदलत्या गरजेनुसार, वाढत्या सोई असा लाभ होतो.
ठळक बाबी-
घर उभारणी, प्लॉट, रोहाऊस, फ्लॅट व दुकान गाळे खरेदी व विक्री सेवा एकाच छताखाली
- २५ जणांना थेट रोजगार
- १०० पेक्षा अधिक ब्रोकर्सना अप्रत्यक्ष रोजगार
- पाच प्रोजेक्टचे काम पूर्ण तर १५ प्रोजेक्टची सेवा सुरु
- गृहप्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन
- घरखरेदीसाठी २५ पेक्षा अधिक वित्तीय संस्थाची सेवा
- बिल्डरांना गृहप्रकल्प सर्वेक्षण व उभारणी सल्ला सेवा
- गृहप्रकल्पाचे मार्केटींग व विक्रीसेवा
- प्लॉट खरेदीपासून ते घरबांधणी हस्तांतरणापर्यंत २० पेक्षा अधिक सेवा
जमीन व्यवहाराची कायदेशीर चौकट व ग्राहकांचा विश्वास या बळावर काम करत आहोत. एकाच दिवसात संपूर्ण गृहप्रकल्प नोंदणी पूर्ण करण्याचा विक्रम पुढील काळात करायचा आहे.-
अमर बिराजदार, संचालक,ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन, सोलापूर