सोलापूर महानगरपालिकातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (DAY-NULM) स्वयंरोजगार कार्यक्रम अंतर्गत कॅनरा बँक चाटी गल्ली येथील ओमसाई,श्रीलक्ष्मि,शिवालय,महिला बचत गट,कॅनरा बँक सात रास्ता येथे आफिया,नई रोशनी,मायरा,एकता,उर्जा,वासुदेव महिला बचत गट,सैफुल शाखेमधून गुरुदेव महिला बचत गट,सेन्ट्रल जुळे सोलापूर,HDFC बँकेकडून अंबाबाई,सर्वात्मक महिला बचत गट यांना कर्जवितरण करण्यात आले आहे.
सोलापूर महानगरपालिका आयुक्त मा. शितल तेली उगले यांच्या हस्ते सदर बचत गटांना प्रतीकात्मक धनादेशाचे वाटप दिनांक ०५/१०/२०२३ रोजी करण्यात आले आहे,विभागाकडून या आर्थिक वर्षामध्ये एकूण ४० बचत गटांना एकूण १,२०,३५००० हजार रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आलेले आहे,तसेच सदर प्रसंगी मा आयुक्त यांनी बचत गटांच्या व्यवसायाविषयी माहिती घेवून व्यवसायवाढी करीता गटांना मार्गदशन केले सदर प्रसंगी NULM विभागाचे शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त श्री मच्छिंद्र घोलप यांचेही मार्गदर्शन गटांना प्राप्त झाले सदर प्रसंगी शहर अभियान व्यवस्थापक उज्वला गणेश,समीर मुलाणी तथा समुदाय संघटक उपस्थित होते