सोलापूर – 27 ऑक्टोबर रोजी पुण्यातील समता भूमी म.फुले वाडा येथून लखीमपूर शहीद किसान अस्थिकलश अभिवादन व महाराष्ट्रव्यापी जनजागृती यात्रेची सुरुवात होऊन कोल्हापूर,सांगली मार्गे रविवार 31ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता देगाव नाका येथे आगमन होणार आहे.तदनंतर सांयकाळी 5 वाजता शिवछत्रपती रंगभवन येथे सर्व समविचारी, पुरोगामी,प्रागतिक,डावे असे सर्वपक्षीय शहीद अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय नेते कॉ.सिद्धपा कलशेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अभिवादन सभेच्या तयारी करीता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विस्तृत बैठक पार पडली.
लखीमपूर शेतकऱ्यांवरील हल्ला हे केंद्र सरकारचे अंतरंग आहे.या देशात लोकशाही मार्गाने करत असलेल्या आंदोलनांवरील हल्ले,खोटे व देशद्रोहाचे गुन्हे, धर्म आणि जातीच्या आधारांवर लोकांच्या भावना भडकावणे ही केंद्र सरकार शृंखला आहे.हे तोडणे आपल्या समोरचे आव्हान आहे. तसेच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या शहीद शेतकरी रक्त सांडले त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही ही प्रेरणा पूढे घेऊन जाण्यासाठी ही अभिवादन सभा आहे.अशा शब्दांत कॉ.नरसय्या आडम मास्तर मार्गदर्शन केले.
याची जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक संघटना,राजकीय पक्ष पुढाकार घेऊन प्रचार व प्रसार करणे आवश्यक असल्याचे माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांनी सांगितले.
या बैठकीत बापू साबळे,शकुंतला पानिभाते, मल्लेशम कारमपुरी,दत्ता चव्हाण,इलिसास सिद्दीकी आदींसह अन्य जनसंघटना पदाधिकारी यांनी कार्यक्रमाची आखणी व नियोजन बाबत मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर सिद्धपा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी,कुरमय्या म्हेत्रे,युसूफ मेजर, प्रा.अब्राहम कुमार,रंगप्पा मरेड्डी, अनिल वासम आदींची उपस्थिती होती.
याचे सूत्रसंचाकन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले.