वॉशिंग्टन : अमेरिकेने काबूलमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी ठार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता होता.
अमेरिकेने मे २०११मध्ये अल-कायदाचा म्होरक्या आणि ११/७चा हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन याचा अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर इजिप्शियन सर्जन असलेल्या अयमान अल जवाहिरीने अल-कायदाची सूत्रे होती. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या चार विमानांचे अपहरण करण्यात त्याने मदत केली होती. दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर, अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय पेंटागॉनवर केलेल्या हल्ल्यात सुमारे ३ हजार अमेरिकन नागरिक ठार झाले होते