महापौर विनायक कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसलें, अधीक्षक अभियंता अनिल चव्हाण तसेच संबंधित विभागीय अधिकारी बक्षी यांच्या समवेत परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली.या वेळी पश्चिम महाराष्ट्र पदशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, पदशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, विश्वस्त नरसप्पा इप्पाकायल, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, विश्वनाथ दुर्लेकर, छत्रपती अवशेट्टी,भूलिंगम रापेलली, भोजराज पवार, गणेश बिराजदार, सुरेंद्र शिंदे, विनायक खरात, सुनील पाचंगे तसेच पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




पाहणीदरम्यान खालील सुधारणा तातडीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या :
सक्षम व जबाबदार वॉचमनची नियुक्ती
स्वच्छ शौचालयाची व्यवस्था
पूर्वेकडील बाजूस कंपाउंड वॉल उभारणे व विद्यमान भिंतीची उंची वाढविणे
मुख्य प्रवेशद्वारावर सुयोग्य नावाची कमान
स्मशानभूमीकडे जाणारा सुसज्ज रस्ता तयार करणे
योग्य कचरा व्यवस्थापन व कचरापेट्यांची व्यवस्था
परिसरात लाईट पोल्सची संख्या वाढविणे
साचलेला अजोरा तातडीने काढणे



ही केवळ जागा नसून आपल्या श्रद्धा आणि अंतिम निरोपाचा सन्मान आहे. स्मशानभूमी स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक असणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली असून लवकरच आवश्यक कार्यवाही होईल, अशी आश्वासन सोलापूर महापालिका नूतन महापौर आणि आयुक्त आणि प्रशासक यांनी दिली

