येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर मुळेगावं तांडा हैद्राबाद रोड येथील कत्तल खाना अनेक दिवसापासून सुरु आहे. त्याची अधिकृत परवानगी ऑक्टोंबर पर्यंत होती. ती परवानगी वाढवू नये. कत्तलखाना बंद करण्यात यावा. त्यामध्ये होणाऱ्या अनेक निष्पाप जिवाचा बळी घेतला जात आहे. गोवंश, गोहत्या थांबली पाहिजे.पशु हत्या थांबली पाहिजे. देश व संस्कृती टिकावी, भविष्य उज्वल बनवीन्यासाठी कत्तलखाना बंद झाला पाहिजे.केंद्र सरकार कडून गोहत्या, गोवंश हत्या बंदी कायदा करण्यात आला आहे. पण त्या कत्तलखाण्याला पूर्वी परवानगी देण्यात आली होती. परंतु ती परवानगी मुदत संपली आहे. मुदत वाढ न देता कत्तलखाना बंद करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे वतीने सोलापूर मा.निवासी उप जिल्हाधिकारी अजित देशमुख साहेब यांना देण्यात आले. या प्रसंगी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ),बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), अभिमन्यु डोंगरे महाराज (म.रा. सदस्य ) जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष ),मोहन शेळके (जिल्हा सचिव ), संजय पवार (शहर अध्यक्ष )कुमार गायकवाड (शहर संघटक ) उपस्थित होते.