येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर पोलिसांनी बुधवारी जेलरोड ,फौजदार चावडी ,एमआयडीसी, जोडभावी पेठ अशा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सराईत गुन्हेगारी करणाऱ्या आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले याला एमपीडीए कायद्याखाली अटक केले आहे. भवानी पेठेतील मराठा वस्ती येथे राहणाऱ्या आकाश याला यापूर्वी एक वर्ष ,तीन वर्ष, सहा महिने अशा सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावलेल्या आहेत .अलीकडच्या काळात आकाश उर्फ अंड्या याने पुन्हा एकदा घरफोडी, चोरी आणि दरोड्याची पूर्वतयारी असे विविध प्रकारचे चार गुन्हे केले आहेत .त्यामुळे समाज विघातक कृत्य तसेच गुंडगिरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या मोहिमेनुसार पोलीस आयुक्तांनी ही कठोर कारवाई केली आहे .अशाच प्रकारच्या कारवाई विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांविरुद्ध चालूच राहतील असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हटले आहे.