सोलापूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन गाडी क्र. 09627/09628 अजमेर – सोलापूर – अजमेर साप्ताहिक हिवाळी विशेष सुपर फास्ट एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
• गाडी क्र. 09627 अजमेर-सोलापूर साप्ताहिक हिवाळी विशेष सुपर फास्ट एक्सप्रेस गाडी अजमेर स्थानकाहून दि. 28.12.202 ( बुधवार) ला सकाळी 09.15 वा. सुटणार पुढे मदार जं., जयपूर, सवई माधोपुर, कोटा, नागदा जं., रतलाम, गोधरा, वडोदरा जं., सूरत, वसई रोड, कमान रोड, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड दुसऱ्या दिवसी सकाळी आगमन 09.05 प्रस्थान 09.07, कुर्डूवाडी आगमन 10.03 प्रस्थान 10.05 सोलापूर ला सकाळी 11.30 वा. पोहचणार.
• गाडी क्र. 09628 सोलापूर – अजमेर साप्ताहिक हिवाळी विशेष सुपर फास्ट एक्सप्रेस गाडी सोलापूर स्थानकाहून दि. 29.12.2022 (गुरुवार) ला दुपारी 12.50 वा. सुटणार पुढे कुर्डूवाडी आगमन 01.43 प्रस्थान 01.45, दौंड आगमन 03.23 प्रस्थान 03.25 , पुणे, लोणावळा, कल्याण, कमान रोड, वसई रोड, सूरत, वडोदरा जं., गोधरा जं., रतलाम, नागदा जं., कोटा, सवई माधोपुर, जयपुर, मदार जं., आणि अजमेर ला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 05.05 वा पोहचणार . डब्यांची सरचना : गार्ड कम लगेज -2, वातानुकूलीत द्वितीय श्रेणी- 02 वातानुकूलीत तृतीय श्रेणी-05, शयनयान- 07, जनरल – 04 एकूण 20 कोच असतील .
• गाडी क्र. 09627 अजमेर-सोलापूर साप्ताहिक हिवाळी विशेष सुपर फास्ट एक्सप्रेस ( बुधवार) 28.12.2022 ते 25.01.2023 पर्यन्त एकूण 5 ट्रीप धावणार.
• गाडी क्र. 09628 सोलापूर – अजमेर साप्ताहिक हिवाळी विशेष सुपर फास्ट एक्सप्रेस (गुरुवार) 29.12.2022 ते 26.01.2023 पर्यन्त एकूण 5 ट्रीप धावणार. आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 09627/09628 साठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.
तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.