येस न्युज मराठी नेटवर्क : भाजपाचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळले आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आलेल्या अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत म्हणून महाविकास आघाडी सरकार पडेल असं म्हणत आहेत. गाजर दाखवण्याचं काम सुरु आहे तरीही एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.