­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 11, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सराईत गुन्हेगार अजय गायकवाड एमपीडीए अन्वये स्थानबध्द

by Yes News Marathi
March 25, 2024
in इतर घडामोडी
0
सराईत गुन्हेगार अजय गायकवाड एमपीडीए अन्वये स्थानबध्द
0
SHARES
144
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, अजय राजु गायकवाड, वय ४३ वर्षे, रा. न्यु धोंडीबा वस्ती, रामवाडी, सोलापूर हा मागील काही वर्षापासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन बेकायदेशीर जमाव जमवीने, दुखापत करणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग करणे, हयगईनी दुखापत करणे, लैगिंक अत्याचार, लैगिंक छळ आणि अनुसुचित जाती व अनुसूचित जमातींवर अत्याचार करणे, प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०६ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. अजय राजु गायकवाड याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.

अजय राजु गायकवाड यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२० मध्ये क.५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधि. १९५१ अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.२२/०३/२०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास दि. २४/०३/२०२४ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त एम. राज कुमार, यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), मा. विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अजय परमार, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०२, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री. उमाकांत शिंदे, वपोनि, सलगर वस्ती पोलीस ठाणे, पोउपनि/विशेंद्रसिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.

Tags: Ajay GaikwadMPDA
Previous Post

सोलापूरची लेक तुमचंही सोलापुरात स्वागत करते..!

Next Post

अनमोल केवटे सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

Next Post
अनमोल केवटे सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

अनमोल केवटे सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group