उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केल्याने एकच संतापाची लाट उसळली आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांनी या प्रकारावर भाजप महायुतीवर जोरदार ‘प्रहार’ केला आहे. शेतकऱ्यांची चेष्टा लावली असून, कृषीमंत्र्यांची ही नववी चूक आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरूच राहिल, भाजप महायुतीविरोधात राज्यभरात 24 जुलैला ‘चक्काजाम’ करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.