• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलार कार निर्मितीसाठी ऑर्किड-प्रिसिजन यांच्यात करार

by Yes News Marathi
January 12, 2021
in मुख्य बातमी
0
सोलार कार निर्मितीसाठी ऑर्किड-प्रिसिजन यांच्यात करार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरातील या अनोख्या प्रोजेक्टला पुण्याच्या ‘ला फाउंडेशन डसॉल्ट’चेही सहकार्य

सोलापूर : प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड आणि नागेश करजगी ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज यांच्यात सोलार कारच्या निर्मितीसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे नव्या वर्षाच्या मुहूर्तावर सोलापूरात ‘सोलार कार’च्या निर्मितीला चालना मिळणार आहे.

प्रिसिजनने सोलापूरातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे स्किल अपग्रेडेशन करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने हा करार करण्यात आला असून त्यानुसार ऑर्किडचे विद्यार्थी प्रिसिजनच्या सहकार्याने सोलार कार बनवतील. यासाठी पुणे येथील ‘ला फाउंडेशन डसॉल्ट’ यांच्याकडूनही सहाय्य मिळणार आहे.

प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. करण शहा आणि ऑर्किडच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. श्रीनिवास मेतन यांच्या पुढाकाराने हा प्रोजेक्ट सुरु झाला आहे. त्याअंतर्गत प्रतिवर्षी ऑर्किड कॉलेजच्या २४ विद्यार्थ्यांची बॅच दोन आसनी सोलार कारची निर्मिती करेल. अक्कलकोट रोड एमआयडीसीतील प्रिसिजनच्या प्लांटमध्ये या कारच्या निर्मितीसाठी खास ‘व्हेईकल डेव्हलपमेंट सेंटर’ उभारण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून ऑर्किडच्या विद्यार्थ्यांना जगातील सर्वात मोठी व उत्कृष्ट कॅमशाफ्ट उत्पादक कंपनी असणार्‍या ‘प्रिसिजन’सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

ऑर्किड कॉलेजच्या ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’ धोरणानुसार नव्या वर्षात या अनोख्या उपक्रमाची सुरवात होत आहे. इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट यांच्यातील अंतर कमी करणारा व मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देणारा असा हा आगळावेगळा उपक्रम ठरणार आहे. या सामंजस्य करारावेळी ऑर्किड कॉलेजचे प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. आदित्य ढोबळे, प्रा. बसवराज बिराजदार, प्रिसिजनच्या जनसंपर्क विभागाचे आदित्य गाडगीळ हे उपस्थित होते.

Previous Post

आज 13 शहरांमध्ये पोहोचणार ‘कोविशिल्ड’चे डोस

Next Post

श्री सिद्धरामेश्वर स्थापित ६८ लिंगांचे नाव आणि ठिकाण

Next Post
श्री सिद्धरामेश्वर स्थापित ६८ लिंगांचे नाव आणि ठिकाण

श्री सिद्धरामेश्वर स्थापित ६८ लिंगांचे नाव आणि ठिकाण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group