नागपूर – हिंसाचार प्रकरणी परिस्थितीची पाहणी करायला आलेले काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांना काँग्रेसच्या पाहणी समिती संदर्भात आणि त्यास वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीक संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना हुसेन दलवाई यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबचा इतिहास समजून घेण्याचा सल्ला दिला. यापुढे दलवाई म्हणाले की संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या पद्धतीने मारले, ती क्रूरता होती. मात्र, औरंगजेबाने त्याचा भाऊ दाराशिकोहला जसं मारलं होतं, त्याच पद्धतीने औरंगजेब ने संभाजी महाराजांनाही मारले. मात्र, संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडितानी सांगितल्याचा दावा हुसेन दलवाई यांनी केला. इतिहासाचा हा पैलू फडणवीस मान्य करतील का? वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही, असे हुसेन दलवाई यांनी म्हटले.