महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना भाजपने त्यांनी विरोध केलेल्या अनेकांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देखील दिली. महापालिका निवडणुकीत भाजपचे निवडून आलेले 87 नगरसेवक हे पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आ. देवेंद्र कोठे यांच्याच पॅटर्ननुसार आले. भाजपने जाहिरात बाजी करून यातही दोन्ही देशमुखांना जास्त किंमत दिली नाही. आता झेडपीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुभाष देशमुख यांना पुन्हा भाजपबरोबर संघर्ष करावा लागत आहे उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि गणाची उमेदवारी देताना दिलीप माने यांच्याच गटाचे वर्चस्व दिसून आले. सुभाष देशमुख यांचे विरोधक इंद्रजीत पवार यांना बीबी दारफळ मधून, माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांना कोंडीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात इंदुमती अलगोंडा पाटील, सुरेश हसापुरे, शिवानंद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती आपल्याच मतदारसंघात हस्तक्षेप पाडल्यामुळे सुभाष देशमुख यांनी नाराज होऊन राजीनामा देण्याचा इशारा दिला होता त्यानंतर इंदुमती अलगोंडा पाटील, हासापुरे यांना ए बी फॉर्म पक्षाने दिले नाही त्यामुळे हतुर गटातून आमदार सुभाष देशमुख यांनी सुचवलेले डॉक्टर चनगोंडा हवीनाळे यांच्या सून उज्वला हवीनाळे यांना एबी फॉर्म दिला गेला आहे. इंदुमती अलगोंडा यांना जाहीर केलेली उमेदवारी सुभाष देशमुख यांच्यामुळे रद्द झाली. आता हत्तुर गणातून हसापुरे ऐवजी पंचपा धनशेट्टी आणि औरादगणातून शिवानंद पाटील ऐवजी संदीप टेळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंद्रूपच्या मळसिद्ध मुगळे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली होती मात्र सुभाष देशमुख यांनी विरोध केल्यामुळे मंद्रूप गणातून रेवणसिद्ध मेंढगुदले यांना एबी फॉर्म देण्यात आला. एकूणच आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार दिलीप माने यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बळ दिल्यामुळे सुभाष देशमुख यांना स्वतःच्या मतदारसंघातच मोठा संघर्ष करताना पाहायला मिळाले.

