जगातील नंबर 1 चा टेनिसपटू असणारा सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. रशियाच्या डेनिल मेदवेदेवने त्याला पराभूत करत त्याला एका मोठ्या विक्रमापासून दूर ठेवले .
टेनिस विश्वातील सर्वाधिक म्हणजेच 21 वैयक्तीक ग्रँडस्लॅम आणि एकाच वर्षात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा तीनही ग्रँडस्लॅम विजयानंतर अमेरिकन ओपन जिंकण्याचे नोव्हाकच स्वप्न तुटले . नोव्हाकला या पराभवाचा धक्का सहन होत नसल्याने सामना हातातून निसटत असताना नोव्हाकचे रौद्ररुप सर्वांसमोर आले . तो मैदानातच बॅडमिंटन रॅकेट आपटू लागला.
वैतागलेल्या नोव्हाकचा हा रॅकेट आपटतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सामना सुरु असताना मेदवेदेवने पहिला सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. त्याने नंतर पुढे जाऊनही आपला सामन्यातील दबदबा कायम ठेवला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये एक पॉइंट गमावताच नोव्हाक इतका वैतागला की त्याने त्याचे रॅकेट जोरजोरात जमिनीवर आपटण्यास सुरुवात केली. हे दृष्य पाहून सर्वचजण हैराण झाले आहेत.