आज दिनांक 19 में 2025 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत चालू असलेल्या विभाजन प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रम शाळेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध मागण्यासाठी आज दिनांक 19 मे 2025 रोजी शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री सुजितकुमार काटमोरे सर यांनी पुनम गेट जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने या. सहाय्यक संचालक सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.


संघटनेच्या विविध मागण्या खालील प्रमाणे
(१) जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांची यादी तयार करताना नव्याने मान्यता मिळालेल्या शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात यावे व त्यांच्या जागी सेवा जेष्ठतेनुसार जुन्या अतिरिक्त शिक्षकांना कायमस्वरूपी समायोजन करण्यात यावे
(२) अतिरिक्त शिक्षकांचे इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये कायमस्वरूपी समायोजन शक्य नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करण्यात यावे
(३) यावर्षीची समायोजन प्रक्रिया रद्द करावी व सर्व अतिरिक्त शिक्षक /कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊन त्यांना सेवानिवृत्ती पर्यंत मूळ शाळेतच कायम ठेवावे.
या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्याने सोमवार दिनांक 19 मे 2025 पासून माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर यांच्या विरोधात संघटनेच्या वतीने पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सदर निवेदन देताना सुजित कुमार काटमोरे जिल्हाध्यक्ष, विकास दसाडे, जिल्हाप्रमुख विजय काशीद ,जिल्हा सचिव शुक्राचार्य, धवन व किरण सरकाळे जिल्हा उपाध्यक्ष, प्रियदर्शनी आवटे, महिला आघाडी प्रमुख बसवंत बगले जिल्हा कार्याध्यक्ष, चंद्रकांत शिंदे कोषाध्यक्ष, अली साहेब मुल्ला जिल्हा संघटक, विजयकुमार गुंड ,शरद पवार, योगेश टोणपे, शरीफ चिखली, अमोल तावस्कर, राजकुमार देवकते, सुरेश कनमुळसे, मायप्पा हाके , नितीन रुपनर,वरील सदस्य याप्रसंगीउपस्थित होते.