- सोलापूर : जिल्हा परिषदेचे उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे यांच्याकडे सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसे आदेश वित्त विभागाने काढले आहेत.
महानगरपालिका मुख्य लेखा व वित्त अधिकारी( मुख्य लेखापाल) या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सहायक संचालक संवर्गातील अधिकारी उत्तम सुर्वे ( उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर) यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे.
- सुर्वे यांनी त्यांच्या सध्याच्या कार्यरत पदाचा नियमित कार्यभार सांभाळून सोलापूर महापालिका मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे अवर सचिव ता.र. पवार यांनी आदेशात म्हटले आहे.