• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माजी आमदार आडम मास्तरांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट

by Yes News Marathi
June 24, 2024
in मुख्य बातमी
0
माजी आमदार आडम मास्तरांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतले व भाजपचा पराभव करणे कामी भरीव योगदान दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकप ला सामावून घेतले जाईल. माकप च्या प्रस्तावावर चर्चा होईल.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासोबत मी विधी मंडळात काम केलेला आहे.कामगार – शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे.या साठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून जिंकतील यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालण्याचे सकारात्मक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार नाना पटोले आश्वासन दिले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर 24 जून रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नेते मा. श्री. नाना पटोले याची मुंबईत भेट घेतली.

प्रतिनिधी मंडळात डॉ. उदय नारकर, मा. आ. नरसय्या आडम, आ. विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, किरण गहला आदींची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील मा. श्री.नाना पटोले यांच्या भरीव कामगिरी बद्धल माकप च्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले.

लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे, आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षांचे नाना पटोले यांनी विशेष कौतुक केले. आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत एक तास सांगोपांग चर्चा केली.

माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या सोलापूर – शहर मध्य ठाणे – डहाणू -तलासरी ,विक्रमगड शहापूर, नाशिक – नाशिक पश्चिम , कळवन, दिंडोरी, इगतपुरी अहमदनगर – अकोले, बीड – माजलगाव , परभणी – पाथरी नांदेड – किनवट या 12 विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले.

Previous Post

सोलापूर बाजार समिती समोर होणार दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल…

Next Post

शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही पंढरीच्या वारीत पायी चालणार?

Next Post
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही पंढरीच्या वारीत पायी चालणार?

शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही पंढरीच्या वारीत पायी चालणार?

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group