सोलापूर : 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड नरसय्या नारायण आडम मास्तर यांनी आपल्या प्रस्तावकासह कार्यकर्त्यांसोबत आज रोजी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माकपचे जिल्हा सचिव ॲड.कॉ. एम.एच. शेख, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, ॲड.कॉ. अनिल वासम, कॉ.बापू साबळे, कॉ.गजेंद्र दंडी, कॉ.सनी शेट्टी, कॉ. दीपक निकंबे, कॉ. नरसिंग म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.