येस न्युज मराठी नेटवर्क । मुंबई महापालिका बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करत असल्याने सध्या चर्चेत असलेला अभिनेता सोनू सूद बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचला. सोनू सूदने शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. पण सध्या महापालिकेकडून गंभीर आरोप होत असल्याने सोनू सूदने याविषयी चर्चा केल्याची शक्यता आहे.
बेकायदा बांधकामाप्रकरणी वारंवार नोटीस बजावून आणि कारवाई करूनही अभिनेता सोनू सूदने कायद्याचे उल्लंघन करणे थांबवले नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच आहे, असा दावा पालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात केला. तसंच सोनूला करवाईपासून कोणताही दिलासा देऊ नये, अशी मागणीही केली.