येस न्युज मराठी नेटवर्क । चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे गुरूदासपुरचे खासदार सनी देओल यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव यांनी मंगळवारी सनी देओल यांना करोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सनी देओल गेल्या काही महिन्यांपासून कुल्लू येथे वास्तव्यास होते अशी माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिली. “कुल्लूच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईकडे रवाना होण्याची तयारी करत होते. परंतु त्यादरम्यान मंगळवारी सनी देओल यांना करोनाची लागण झाली,” अशी माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.