मुंबई : एसटी संपादरम्यान सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नसल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली आहे. तसेच एसटी महामंडळातील जे कर्मचारी कामावर हजर होत नाहीत त्यांच्यावर मेस्माअंतर्गतकारवाई होण्याची शक्यता आहे. पण हा मेस्मा म्हणजे नेमकं काय? मेस्माचा वापर कधी करण्यात येतो? जाणून घेऊयात मेस्मा कायद्याबाबत सविस्तर
Mesma कधी लावण्यात येतो?
नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळायलाच हव्या. त्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. अनेकदा साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चा आणि आंदोलनाला रोखण्यासाठी Mesma लावण्यात येतो.