वाळू सह एक लाख 35 हजारांचा माल जप्त
येस न्युज मराठी नेटवर्क : सलगर वस्ती पोलिसांनी एकवीस एप्रिल रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास डोणगावकडून तेलगावकडे जात असलेल्या सहा वाहनांमधून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करीत असल्याने कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन छोटा हत्ती, दोन टाटा ए सी चार चाकी वाहने , हिरो कंपनीची डीलक्स कंपनीची मोटार आणि यामा कंपनीची मोटर सायकल अशी सहा वाहने जप्त केली. वाळू सह सर्व मुद्देमाल 1 लाख 35 हजार रुपयांचा आहे, या प्रकरणी रविकांत शिंदे, नंदकुमार ननावरे, विकास सुरवसे सर्व राहणार शिंदे वस्ती डोणगाव रोड आणि न्यानेश्वर विठ्ठल शिंदे सोन्या मारुती मंदिराजवळ डोणगाव रोड यांना ताब्यात घेतले आहे. ही वाळू पाथरी नंदूर तेलगाव गावातील नदीमधून चोरून आणून विक्री करण्याचे उद्देशाने एस्कॉर्ट करीत घेऊन जात असताना सर्व आरोपी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे अधिक तपास करीत आहेत.