येस न्युज मराठी नेटवर्क : पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशाने आज शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी वाहन चालवताना हेल्मेट परिधान न करणाऱ्या एकूण 17 पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांची वाहने ट्राफिक ऑफिस येथे जमा करण्यात आलेली आहेत. ही कारवाई या पुढेदेखील चालू राहणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वाहन चालवताना हेल्मेट परिधान करावे अन्यथा त्यांचेवर कारवाई करण्यात येईल.