महायुतीचे मित्र आमदार आमदार राम सातपुते यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सोलापूर : मी कोणतीही तक्रार दिलेली नसताना मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी वडवळ (ता. मोहोळ) येथील मराठा युवकांना चुकीच्या पद्धतीने कारवाईच्या नोटिसा दिलेल्या आहेत. त्यामुळे तहसीलदार सचिन मुळीक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
वडवळ या गावी मी अद्याप गेलेलो नाही. तेथील बांधवांनी मला विरोध केलेलं नाही माझी कुठलीही तक्रारही नाही. मी कोणाकडेही कारवाईची मागणी केलेली नसताना तहसीलदार सचिन मुळीक यांनी मराठा युवकांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्याचा मी निषेध करीत आहे. अशा पद्धतीने नोटीसा काढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार सचिन मुळीक यांच्यावर कारवाई करावी. मी मराठा समाजाच्या भावनेचा आदर करतो. मी कायम मराठा समाजासोबत उभा राहणारा कार्यकर्ता आहे. मराठा समाजासाठी मी विधानसभेत आवाज उठवलेला कार्यकर्ता आहे. भविष्यातही खासदार म्हणून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, यासाठी मी मराठा समाजासोबत राहणार आहे. जिल्हाधिकारी यांनी चुकीची नोटीस दिल्याबद्दल तहसीलदार सचिन मुळीक यांच्या कारवाई करावी आणि ती नोटीस मागे घ्यावी, अशी मागणी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केली.