येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकोट मोहोळ कामती तसेच बी बी दारफळ ते सावळेश्वर रोडवर अवैध वाळू माफियांविरुद्ध धाडसत्र करून चार ठिकाणी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 36 लाख 96 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . यामध्ये चार टेम्पो एक ट्रक एक ट्रॅक्टर तसेच वाळू व मोबाईल अशा मालाचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानंतर वाळू माफियांवर धाड घालण्यासाठी पथके तयार करून सात व आठ एप्रिल रोजी चार ठिकाणी कारवाई केली.