सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात आठ जून रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये ३५२ वाहनांची तपासणी करून ९८,२०० रुपयांचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या १३७ व्यक्तींविरुद्ध कारवाई करून ६९ हजार रुपये दंड करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५० जणांविरुद्ध कारवाई करून २९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.