सोलापूर : अनैतिक संबंधातून खून करणाऱ्यास जोडभावी पेठ पोलिसांनी काही तासात अटक केली आहे.हैदराबाद रस्त्यावरील दहीटने येथील सलीम रजाहामाड शेख या शेलागी येथील तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी नबीलाल शेख यास अटक करण्यात आली.सलिमचा खून अंनेतिक संबंधातून झाला असावा असा पोलिसांना संशय आहे.आरोपी नबिलाल यास ६ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.