सोलापूर : अत्त्याचार प्रकरणात तरुणास जामीन मंजूर यांत हकीकत अशी की, पिडीत तरुणीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद देऊन संजय म्हाळप्पा वाघमारे व पिडीत हे भारतरत्न इंदिरागांधी कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतांना सन २०१८ मध्ये उभयंताचे ओळख झाले त्यामुळे एके दिवशी संजय हा पिडीत राहात असलेल्या खोलीवर येऊन पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार केला.
तदनंतर सन २०१९ मध्ये पिडीता ही पुणे येथे नोकरी करीत होती. त्यावेळी पिडिता पुणे येथे राहात असलेल्या खोलीवर येऊन मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे असे म्हणून अत्याचार केले. अशा प्रकारची फिर्याद पिडीतीने दाखल केले होती. सदर गुन्हयात संजय म्हाळप्पा वाघमारे यांस पोलीसांनी अटक केले होती.
त्या गुन्हयात जामीन मिळण्यासाठी संजय म्हाळप्पा वाघमारे यांनी ॲङ भिमाशंकर एम . कत्ते यांचे मार्फत सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सदर अर्जाच्या सुनावणी वेळी ॲड. भिमाशंकर एम. कत्ते यांनी केलेला युक्तीवाद, उच्च व सर्वोच्च न्यायालयाची दाखल केलेले न्यायनिवाडयाचा विचार करुन मे. यु. एल. जोशी यांनी संजय म्हाळप्पा वाघमारे यांस जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिला. सदर प्रकरणात आरोपी तर्फे ॲड. भिमाशंकर एम. कत्ते तर सरकार तर्फे ॲड. शैलजा क्यातम यांनी काम पाहिले.