सोलापूर दिनांक – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांची नात तसेच युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी याची कन्या शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 च्या सुमारास विक्रम कलबुर्गी यांची पत्नी रेणुका व मुलगा अभिषेक व मुलगी साक्षी यांना शिकवणी ला सोडण्यासाठी जाताना तालुका पोलीस स्टेशन समोर एक डांपर MH 13 EF 9388 ही गाडी भरदाव वेगाने येऊन यांच्या स्कूटी ला धडकले व गंभीर अपघात झाला.
त्यात साक्षी गंभीर जखमी झाली. तात्काळ महिला रुग्णालय दाखल केले तदनंतर अश्विनी रुग्णालय येथे नेण्यात आले. उपचारा पूर्वी साक्षी चे निधन झाल्याचे डॉक्टरांनी मयत घोषित केले. सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले.उद्या सकाळी 10 वाजता सात रस्ता मोदी येथील खिश्र्चन समाज स्मशान भूमी येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विक्रम कलबुर्गी यांना दोन मुली,दोन मुले असा परिवार आहे.