• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पुणे-सोलापूर हायवेवर अपघात; लातूर येथील तीन जण जागीच ठार

by Yes News Marathi
February 8, 2021
in मुख्य बातमी
0
पुणे-सोलापूर हायवेवर अपघात; लातूर येथील तीन जण जागीच ठार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: भरधाव फॉर्च्युनर कारची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलरला पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात लातूर येथील तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमी हे एकाच कुटुंबातील आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, फॉर्च्युनर गाडी व त्यातील जखमींना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण जवळ डाळज नं. २ च्या हद्दीत (ता. इंदापूर जि. पुणे) रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यात गीता अरुण माने (वय ३६) मुकुंद अरुण माने (२५) व अरुण बाबूराव माने (४५ तिघे रा. लातूर जि.लातूर) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर साक्षी अरुण माने (१८), महादेव रखमाजी नेटके (५६ रा.लातुर) हे जखमी झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त ट्रॅक्टर (एम.एच.४५ एफ.७७७९) पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं निघाला होता. डाळज नं. २ येथे त्याच दिशेने फॉर्च्युनर कार (एम.एच.२४ एटी.२००४) भरधाव वेगाने येऊन ट्रेलरला पाठीमागून धडकली. या भयंकर अपघातात कारचा चक्काचूर झाला. यातील मृत्यूदेह क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले. जखमींना तातडीने उपचारासाठी भिगवण व पुणे येथे पाठवण्यात आले, मात्र उपचारांआधीच तिघांचा मृत्यू झाला, तर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.पुणे सोलापूर महामार्गावरून होणारी ऊस वाहतूक हा गंभीर प्रश्न असून याकडे पोलीस प्रशासन हायवे प्रशासन आणि आर टी ओ विभाग गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही. त्यामुळे निष्पाप नागरिकांना अपघातात आपले जीव गमवावे लागत आहेत.

Previous Post

गोकुळचे चेअरमन भगवान भाऊ शिंदे यांचा मृतदेह आढळला रेल्वे ब्रिजवर

Next Post

दोन माजी मंत्री आणि भाजपने महापालिकेची वाट लावली…!

Next Post
दोन माजी मंत्री आणि भाजपने महापालिकेची वाट लावली…!

दोन माजी मंत्री आणि भाजपने महापालिकेची वाट लावली...!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group