उपोषणाचा 6 वा दिवस
सोलापूर दिनांक – लाल बावट्याच्या मुशितले आमचे कार्यकर्ते कॉ. लक्ष्मण माळी व शहाबुद्दीन शेख यांनी कामगारांच्या मागण्या घेऊन उन, वारा पावसाची तमा न बाळगता अन्नत्याग करून बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा सहावा दिवस आहे. सहा.कामगार आयुक्त म्हणतात उपोषण सोडा आणि चर्चेतून प्रश्न सोडवू पण गेंड्याची कातडी असणारे कारखानदार बैठकीला येतात निर्णय मात्र घेत नाहीत.म्हणून जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर कामगारांना किमान 8.33 टक्के बोनस द्या असे सूचित केले. जिल्हाधिकारी यांनी दिलेला तोडगा मान्य करा अन्यथा परिमाण होतील. असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी दिला.
लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन (सिटू ) संलग्र सोलापूर च्या वतीने गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सांयकाळी वाजता अ.रोड एम.आय.डी.सी.येथील यंत्रमाग धारक संघ कार्यालय येथे दिवाळी सणाला बोनस व अन्य न्याय हक्काच्या मागण्या घेऊन जाहीर सभा पार पडली.
शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सहा.कामगार आयुक्त, कामगार संघटना आणि कारखानदार यांची संयुक्त बैठक बोलावली आहे.या बैठकीत जर सकारात्मक निर्णय नाही झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करू असा निर्णय युनियन मार्फत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कॉ. युसुफ मेजर मुरलीधर सुंचू, व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, शकुंतला पानिभाते, बाबू कोकणे, मनीषा लोखंडे,अशोक बल्ला, ॲड.अनिल वासम आदींची व्यासपीठावर उपस्थित होती. प्रास्ताविक किशोर मेहता यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड.अनिल वासम यांनी केले.