सोलापूर : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या 30 मुलांना तसेच रेड लाईट एरियातील 32 मुलांना शालेय साहित्य व स्वेटरचे वाटप करून प्रार्थना फाऊंडेशन ने त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
प्रार्थना फाऊंडेशन ही संस्था शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुले,वंचित,निराधार,बेघर,स्थलांतरित तसेच भिक्षा मागणाऱ्या मुलांसाठी काम करते.शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्यावर त्याच्या मागे कुटुंबाचे प्रचंड हाल होतात.आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला कुटुंबप्रमुख म्हणून सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते त्यातच मुलांच शिक्षण हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असातो.शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मूल आर्थिक अडचणी मुळे व शैक्षणिक साहित्य न मिळाल्याने शिक्षणापासून वंचित राहूनये या साठी त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले तसेच रेड लाईट एरियातील महिलांच्या मुलांना ही शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.मूल शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात यावी या हेतूने संस्थेचे कार्य चालते.मूल वेगाने शैक्षणिक प्रवाहात यावीत या उद्देशाने हा उपक्रम घेतला असल्याचे मत संस्थेचे प्रमुख प्रसाद मोहिते यांनी सांगितल.
हा कार्यक्रम बार्शीतील सावळे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. प्रार्थना फाऊंडेशनचे प्रसाद व अनु मोहिते हे दांम्पत्य सोलापुरात कौतुकास्पद काम करत आहेत.प्रसाद मोहिते हे मुळ बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी चे आहेत. दुर्दैवाने त्यांच्या ही वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती त्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वाट्याला येणार प्रत्येक संकट व दुःख त्यांच्या वाट्याला आलं होत.शिक्षण घेण्यामध्ये त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला त्या मुळे शालेय साहित्या आभावी कोणी ही शाळेपासून वंचित राहूनये या साठी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व रेड लाईट एरियातील महिलांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याचे मत मोहिते यांनी व्यक्त केल.
या कार्यक्रमासाठी म्होरक्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अमर देवकर, अॅड. विक्रम सावळे, स्मार्ट अॅकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्राचे संचालक सचिन वायकुळे, कवी रामचंद्र इकारे, उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप, कवी मदन दंदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे तोडभरून कौतुक करताना येणाऱ्या काळात आपणही आपल्यापरीने मदत करू, असे अभिवचन मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लेश इपोळे, भाग्योदय इपोळे, तानाजी तेली, मुतप्पा भारते आदींनी परिश्रम घेतले.
