सोलापूर: नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या आसपासचा काळ खरेदीसाठी शुभ मानला जातो. तसेच देशभरात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. त्यामुळे मालमत्ता खरेदी करायची असेल तर हा काळ सर्वो त्तम आहे. तुम्ही राहण्यासाठी घर खरेदी करा किंवा गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवा, दोन्ही बाबतीत सणासुदीचा काळ चांगला मानला जातो. सणावाराच्या निमित्ताने घर खरेदीसाठी संधी शोधत असाल तर, सध्याच्या काळात मागणीप्रमाणे पुरवठ्याचे गणित चांगले आहे. त्यामुळे हीच एक चांगली संधी ठरु शकते.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डेव्हलपर्स किंवा विकसक सवलती आणि विविध ऑफर आणतात. शिवाय अनेक खरेदीदार सणासुदीच्या प्रतीक्षेत असतात आणि विकासक त्यानुसार त्यांच्या विक्रीचे नियोजन करत असतात.
ग्राहकांची गरज ओळखून रियल इस्टेट मार्केटिंग क्षेत्रात ॲबिलिटी कन्स्ट्रक्शनचे संचालक अमर बिराजदार हे सर्व सामान्य नागरिकांना परवडणारे व श्रीमंतांना आवडणारे त्यांच्या स्वप्नातील घर तेही त्यांच्या बजेटमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी अविरत सेवा देत आहेत.
सोलापुरात रिअल इस्टेटच्या व्यवसायात प्रॉपर्टी डिलिंग आणि कन्सल्टन्सी, प्रोजेक्ट मार्केटिंग आणि सेलिंग, रिअल इस्टेट डिजिटल मार्केटिंग तसेच प्रॉपर्टी खरेदी-विक्री आणि गुंतवणुकीसाठी ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन हा विश्वासार्ह आणि एक उत्तम पर्याय म्हणून बाजारात ‘ब्रॅण्ड’ ठरला आहे.
रिअल इस्टेट बिझनेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या बांधकाम साहित्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून होम लोनचे व्याजदरसुद्धा महागले आहेत. जमिनीचे आणि घरांचे दर वाढत आहेत. घरांच्या किमतींमध्ये लवकरच १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटमधील इन्व्हेस्टमेंट फायद्याची ठरू शकते.

खरेदीचा उत्तम पर्याय : सोलापूरमध्ये बाहेरील लोकांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात अथवा शहरालगत विकसनशील भागात अंदाजे १० ते ९० लाखांपर्यंतचे आपल्या बजेटनुसार ओपन प्लॉट, १ बीएचके, २ बीएचके, ३ बीएचके फ्लॅट्स व रो हाऊस उपलब्ध आहेत. गृहखरेदी, जागा खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीचा निर्धोक पर्याय म्हणून अॅबिलिटी कन्स्ट्रक्शन हे एक उत्तम पर्याय सोलापूरकरांसाठी उपलब्ध आहे.
- अमर बिराजदार, संचालक ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन, सोलापूर