सध्या हिंदी गीताचा जमाना असताना, आशा काळातही स्वरध्यास संगीत विद्यालयाने आषाढी एकादशी च्या पवित्र दिनी अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन केले व रसिका सानिका कुलकर्णी या दोन्ही भगिनींनी लहान वयात देखील संस्कृती ची जपणुक केली व अगदी लहान मुलांच्या तोंडात देखील पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांच्या तोंडून गायलेले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, यांचे अभंग अतिशय उत्तमरीत्या उमटवले.स्वरध्यास संगीत विद्यालयाच्या अभंगवाणी कार्यक्रमास प्रशांत बडवे ,दीपक पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखा पाटील,केशव शिंदे, सुनील कामतकर,रेखा पेम्बर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राम कृष्ण हरी च्या गजराने झाली सुंदर रित्या झाली.यामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर ते ध्यान, झाला महार पंढरीनाथ, अबीर गुलाल,अरे अरे ज्ञाना, अवघे गरजे पंढरपूर, उत्तम प्रकारे सादर केली. या संगीत विद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे 5 वर्षांपासून 70 वर्षापर्यंत चे सर्व विद्यार्थ्यांचा कार्यक्रम सहभाग होता.
संचालिका रसिका व सानिका कुलकर्णी यांनी जोहार मायबाप जोहर, विसावा विठ्ठल, अवघा रंग एक झाला ही गाणी गाऊन श्रोत्यांची दाद मिळवली…विद्यालयाचा कार्यक्रम बघून श्रोत्यांचे डोळे पाणावले.
या कार्यक्रमाचे अतिशय भावयुक्त निरुपणरुपी निवेदन सेवासदन प्रशालेच्या शिक्षिका आश्विनी मोरे यांनी केलेसंगीत संयोजन रसिका , सानिका कुलकर्णी, पखवाज साथ अक्षय भडंगे ,तबला साथ यश जवळकर, व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकारे केली.स्वरध्यास संगीत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी एवढी अवघड गीते ज्याची रचना साक्षात संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज यांनी केली व गानसरस्वती लता मंगेशकर, भारतरत्न पं भीमसेन जोशी यांनी गायली अशी गीते सुंदर रित्या सादर करून उपस्थितांची मने जिंकली…

