सोलापूर – आज सकाळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे स्पाईस एन आईस आयोजित, चितळे एक्स्प्रेस प्रस्तुत अभंगवाणी या भक्तिरसपूर्ण कार्यक्रमाने आषाढी एकादशीला सोलापूरकरांना एक अनोखी सुरेल भेट दिली. 2000 पेक्षा जास्त श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. भल्या पहाटे उठून, बसायला जागा मिळावी यासाठी पहाटे 5 पासून रांगा लागल्या होत्या. हुतात्मा स्मृती मंदिर येथील पायऱ्यांवर, खाली जमिनीवर आणि चक्क स्टेजवर बसून भाविकांनी हा कार्यक्रम पहिला गेल्या ६ वर्षांपासून अभंगवाणी हा कार्यक्रम स्पाईस एन आईस इव्हेंट्स यांच्याकडून आयोजित केला जातो.

दरवर्षी सोलापूरकर आतुरतेने या या कार्यक्रमाची वाट पहात असतात. आजच्या कार्यक्रमात सुद्धा संत परंपरेचा जागर करणारे अभंग, भारूड आणि भक्तिगीतांनी सोलापूरकरांना मंत्रमुग्ध केलं. अपर्णा सहस्रबुद्धे यांच्या “आषाढीला पंढरपूरला” या भारूडाने कार्यक्रमाला दमदार प्रारंभ झाला आणि मग सूरांचा असा काही अविष्कार झाला की रसिक अक्षरशः रंगून गेले. आरोही सहस्रबुद्धे हिच्या निरागस आवाजातील रामभुजंगप्रयात स्तोत्र ऐकताना संपूर्ण सभागृह तल्लीन झालं होतं. अभिषेक काळे, निखिल भालेराव, संगीता बिराजदार, नागनाथ नागेशी, आरोही सहस्रबुद्धे यांचे एकापेक्षा एक सरस अभंग व भक्तिगीते, सचिन जगताप, अविनाश इनामदार, विवेक पोतदार, संभाजी घुले यांच्या वाद्यसंगतीतून भक्तीरस अधिकच खुलत गेला. अपर्णा सहस्रबुद्धे यांच्या अनुभवसंपन्न आणि समर्पक निवेदनाने कार्यक्रमाला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालं.कार्यक्रमात अनेक गाण्यांना टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. विशेषत: अभिषेक काळे यांच्या सावळे सुंदर या गाण्याला विठ्ठल नामाचा गजर आणि आरोही सहस्रबुद्धे हिच्या वृंदावनी वेणू या गाण्याला वन्स मोअर च्या घोषणा झाल्या. दिंडीमध्ये सर्वच बालकलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी आपलं मोलाचं सहकार्य दिलं त्या सर्व प्रमुख, मान्यवर व माध्यम प्रायोजकांना ‘स्पाईस एन आईस’ यांनी मनापासून धन्यवाद दिले. *प्रमुख प्रायोजक* पी. एन. जी. ज्वेलर्स – ध्रुव हॉटेल समोर, सोलापूर ऑटोबान टेरागो (Tata Hitachi dealership) ड्रीम होम इंटीरियर्स – होटगी रोड, सोलापूर *माननीय प्रायोजक* इलेक्ट्रॉनिक्स पार्टनर – सुयोग डिजिटल सारी पार्टनर – व्ही. आर. पवार सरीज् क्रोकरी पार्टनर – सर्वोदय रियल इस्टेट पार्टनर – फिनिक्स हाईट्स मीडिया पार्टनर – दैनिक दिव्य मराठी किचन पार्टनर – ड्रीम होमहेल्थ पार्टनर – मेडिसीटी हॉस्पिटल अँड डायबेटीस केअर हायड्रेशन पार्टनर – स्पेन्का मिनरल वॉटर ज्वेलरी पार्टनर – व्यंकटेश ज्वेलर्स रेडियो पार्टनर – 95 My FM केटरिंग पार्टनर – अनादि केटरर्सउपवास पार्टनर – चितळे एक्स्प्रेसएंट्रेन्स पार्टनर – टाटा प्रवेश ( लक्ष्मी फर्निचर्स & एंटरप्राइझेस)ब्युटी पार्टनर – मानसीज् इन्स्टीट्युट ऑफ मेकअप अँड ब्युटी कुलिंग पार्टनर- ओंकार द कुल वर्ल्ड (डेकीन एयर कंडिशनर्स)हाऊसिंग पार्टनर – आयएमपी ग्रीन्स सोशल मीडिया पार्टनर – आय लव्ह सोलापूर कम्युनिकेशन पार्टनर – आस्क मीप्रत्येक विठ्ठल भक्ताला शेंगदाण्याचा लाडू, पाण्याची बाटली आणि तुळशीचे रोप देण्यात आले. सर्व श्रोते भारावून गेले होते आणि त्यांनी सद्गतीत होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येकाच्या तोंडी हेच होतं – असेच दर्जेदार कार्यक्रम अनीश सहस्रबुद्धे सरांनी व स्पाईस एन आईस टीमने पुन्हा पुन्हा आयोजित करावेत आणि आम्हाला त्याचा आस्वाद घेता यावा!